
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथे नविन्यपुर्ण उपक्रम द्राक्ष व सफरचंद लागवड सविस्तर वृत्त असे की वाढोणा बाजार येथील शेतकरी संदीप निळखंट हांडे यांनी आपल्या शेतात २ एकर मध्ये सपरचंदची लागवड केली व उमेश अंबादासजी झाडे यांनी आपल्या शेतात ४० आर मध्ये १५०० से द्राक्ष झाडांची लागवड केली व टाकळी येथील शेतकरी सुमित राऊत यांनी सुध्दा आपल्या शेतात कोरफडांची लागवड करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा दिली व वाढोणा बाजार व टाकळी येथील शेतकरी यांच्या शेतात यवतमाळ जिल्हा कृषी अधिकारी कोळपकर व राळेगाव तालुका कृषी अधिकारी साठे साहेब यांनी शेतकऱ्यांना भेट दिली व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच जिल्हा कृषी अधिकारी यांनी ठिंबक सिंचना द्धारे खत व्यवस्थापण व फवारणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच येथील शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी अभिनंदन सुध्दा केले यावेळी वाढोणा बाजार येथील कृषी सहायक ताकसांडे,भुरके व शेतकरी उपस्थित होते.
