क्रिडा संकुल राळेगाव येथील ग्रीष्मकालीन क्रिडा प्रशिक्षण शिबीर संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

      

क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा संचालित व जिल्हा क्रिडाअधिकारी यवतमाळ यांच्या विद्यमानाने जिल्हातील 1 मे 2022 ते 31 मे 2022 दरम्यान विविध खेळाचे ग्रीष्मकालीन शिबीर आयोजित केले होते. तरी राजीव गांधी क्रिडा संकुल राळेगाव येथील हँडबॉल , व्हॉलीबॉल व कबड्डी या खेळाचे सुद्धा प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले . या शिबिराला यशस्वी करण्याकरिता हँडबॉल प्रशिक्षक श्री. सागर जुंमनाके यांनी अतिशय कठोर परिश्रम घेऊन या 30 दिवसीय प्रशिक्षण शिबीराला यशस्वी रित्या पार पाडले.
या क्रिडा शिबिराचे वैशिष्टय म्हणजे सकाळी 6.00 ते 8.00 व सायंकाळी 5.00 ते 7.00 या कालावधीत दोन सेशन घेण्यात येत होते . सकाळी सर्व खेळाडूंना ब्रेकफास्ट दिला जात होता . खेळाडूंना हँडबॉल, व्हॉलीबॉल,कबड्डी, फुटबॉल, कराटे, योगा , डॉजबोल, थ्रोबॉल, फिस्टबॉल, एथेलॉटीक या खेळाविषयी आवश्यक ते माहिती देऊन या प्रत्येक खेळतील योग्य प्रशिक्षण देण्यात आले. तर 31 मे ला शिबिराच्या अंतिम दिनी निरोप समारंभ घेण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थिती तालुका क्रीडा सय्योजक तथा तालुका क्रीडा सचिव श्री. विजय कचरे सर , माझी मुख्याध्यापक न्यू इंग्लिश हायस्कूल श्री. अशोक पिंपरे सर , श्री. सागर जुमनाके (हँडबॉल प्रशिक्षक) , निखिल विजय डोंगरे सर ( ब्लाकबेल्ड 2 time ), नरेश दुर्गे (व्हॉलीबॉल प्रशिक्षक ) , स्वप्नील आडे (माझी खेळाडू ) अतुल मेश्राम ( कबड्डी प्रशिक्षक ), रवी भुसंनवार इ. मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल खडसे ( क्रिडा शिक्षक) यांनी केले .
संपूर्ण शिबिराला यशस्वी रित्या संपन्न करण्याकरिता राळेगाव तालुका क्रीडा अधिकारी मा. राऊत मॅडम व मा. तहसीलदार रविंद्र कानडजे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.