
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दीड वर्षाच्या दीर्घ कालावधी नंतर शाळा सुरू झाल्या,करोना महामारी चा प्रतिकार करण्यासाठी शासन स्तरावर ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.या नियमावलीची दखल घेत सावरखेड येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळे मध्ये शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सौ.लताताई चंदेल यांच्या सौजन्याने को रोना संरक्षण किट चा वाटप करण्यात आला.या किट मध्ये मास्क,सॅनिटायझर, विटामिन D, आयरन टॅबलेट या वस्तूंचा समावेश होता.4 ऑक्टोबर पासून शाळा नियमित पने सुरू झाल्या असून ,नियमावलीची काटेकोर पणे अमलबजावणी करावी लागणार आहे.या संरक्षक किट मुळे विद्यार्थ्यांचा कोरोना महामारी पासून सक्षमपणे बचाव होऊ शकतो.कोरोना महामारी चा धोका अद्यापही टळला नसून मास्क,सॅनिटीझर,या महत्वाच्या बाबी आहेत,यांचा योग्य रीतीने वापर होणे आवश्यक आहे.या कोरोना संरक्षक किट वाटप करतेवेळी महाविद्यालयचे प्राचार्य डंभारे सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
