वाढोणा बाजार सोसायटीच्या अध्यक्षपदी रविंद्र देशमुख तर उपाध्यक्षपदी संतोष जाधव

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणुक २० जुन रोजी घेण्यात आली असता बिनविरोध एक मताने सोसायटीच्या अध्यक्षपदी रविंद्र नीलकंठराव देशमुख तर उपाध्यक्षपदी संतोष नथोबा जाधव यांची निवडणुक अधिकारी भगत सचिव विनोद काळे पंकज पराते यांनी करण्यात आली

ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक अरविंदराव वाढोणकर, गणेश येरणे, दिनेश ठाकरे, निळकंठ हांडे, रमेश येरणे, मधुकर सोनटक्के, मनोहर तुराळे, विठ्ठल कुमरे, अंबादास लालसरे, प्रभावती मांडवकर, रजिया शेख, यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करन्यात आले यावेळी सोसायटी चे सचिव विनोद काळे पंकज पराते तसेच गावकरी उपस्थित होते.