चोरट्याने दोन गावात एकाच रात्री केली घरपोडी करंजी व सावळेश्वर येथील चित्त थरारक घटना महिलेच्या गळ्याला चाकु लावून 2.5 लाखाचे दागिने हिसकावले

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

ढाणकी परिसरातील सावळेश्वर व करंजी येथे एकाच रात्री चोरट्यांनी घरपोडी करून दाग दागिन्यासह नगदी रोकड लंपास करून घर वाल्यांना बेदम मारहाण करून पोबारा केला. करंजी येथे 25 हजार रुपयांचे दागिने तर सावळेश्वर येथील दोन घरातून तब्बल सव्वा दोन लाख रुपयाचे दागिने व काही नगदी रोकड पळवण्याची घटना दिनांक ३ जुलै 2022 रोजी रात्री घडली. चोरीच्या कचाट्यात सापडलेल्या कुटुंबियाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने करंजी येथील रहिवासी पंडित कलाने यांच्या घरात साथ चोरट्यांनी घराचे दार तोडुन चोरी करन्यच्या उदेशाने दक्षिणेकडील प्रवेशद्वार तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला घरातील चोरट्यांच्या हालचालीची चाहूल पंडित यांची पत्नी पूजा हिला लागताच तिने आपल्या रूममध्ये झोपून असलेल्या पतीला चोरटे घरात घुसल्याची कल्पना दिली व आपल्या खोलीचे घराचे दार दरवाजा घट्ट बंद करण्याच्या तयारीत असतानाच चोरट्यानी जोर लावुन तो दरवाजा उघडला दरम्यांच्या काळात झोपलेला पती पंडित कलाने जागा झाला दरम्यान पती पंडित व पूजा व आणी चोरट्यात जोरदार झटापट सुरू झाली. चार चोरट्यांच्या गोटमारीचा मुकाबला करताना पती पंडित जखमी अवस्थेतही त्यांच्याशी दोन हात करुन झुंज देत होता तर पूजा तीन चोरट्याचा प्रतिकार करत बाजूच्या खोलीत झोपलेल्या सासऱ्याच्या रूमची बाहेरून बंद असलेली कडी उघडण्यासाठी धडपडत होती. एरवी भिटुकली म्हणून घरात परिचित असलेली 32 वर्षाची विवाहित पूजा तीन चोरट्याचा प्रतिकार करताना तिच्यात कोठून शक्ती एकवटली हे एक आश्चर्यच दरम्यानच्या काळात चोरट्या सोबत झटापट करत असताना चोरट्यांची गोटमार सुरूच होती. सासरा गणेशराव कलाने मदतीला धावताच काही कळायच्या आत चोरांनी त्यांच्यावर दगडाचा मारा सुरू केला. चोराच्या तावडीतुन स्वताचे सुटका झाल्याच्या संधीचा फायदा घेत पूजाने हातात काठी घेऊन घराचे टिन पत्रे आत मधून वाजवायला सुरुवात करून आरडा ओरड सुरू केली अशात चोरांनी आता पकडले जाऊ शकतो या भीतीपोटी पंडित कलानीच्या डोक्यात जबरदस्त मारून त्याला गभीर जखमी केले आणि पूजाच्या गळ्यातील अंदाजे पाच ग्रॅमची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली. पूजाच्या धाडसी कृतीमुळे चोरांना फारसे काही हाती लागले नाही त्यामुळे चोरांनी आपला मोर्चा सावळेश्वर गावाकडे वळविला तेथे नागोराव नारायण रावते यांच्या किराणा दुकानाचे लोखंडी शटर वाकून दुकानातील 20 हजार रुपये नगदी रोकड वर हात मारला त्यानंतर दुकानाला लागूनच असलेल्या खोलीत त्यांची आई जिजाबाई नारायण रावते वय 65 वर्षे ह्या झोपेत असताना तिला जागे करून तिच्या गळ्याला चाकू लावून अंगावरील दागदागिने लुटले एवढेच नव्हे तर खोलीत असलेल्या बंद कपाटाच्या चाव्यांची मागणी केली माझ्याकडे नाहीत असे म्हाताऱ्या आईने सांगतात गजाच्या साह्याने त्यांनी कपाट तोडून त्यामध्ये असलेले लहान मुलांचे दागिने चोरले दरम्यानच्या काळात चोरांच्या हालचाली आणि आईची ओरड यामुळे लागूनच असलेल्या खोलीमध्ये नागोराव रावते यांचे बंधूंना जाग आली डोकं दार उघडून डोकावताच चोरट्याने त्याच्यावर दगड फेक सुरु केली आणि सर्व मुद्देमाल दागिने घेऊन पसार झाले त्याच गावात संभाजी गोविंदराव सादलवाड यांचे किराना दुकानातील गला फोडून तेथील दुकानात असलेली बारा हजार रुपयांची नगदी रक्कम घेऊन चोरटे पसार झाले दोन गावात झालेल्या या जबरी जबरी चोरीमुळे परिसरात चोरांची दहशत पसरली आहे मागील एका वर्षापासून चोरट्यांनी ढाणकी परिसराला लक्ष केले आहे गांजेगाव टेंभेश्वरनगर शमशेर नगर सोईट सावळेश्वर इत्यादी ठिकाणी दिवाळीच्या कालावधीत घर फोडी करून दाग दागिने चोरून नेल्याच्या अनेक घटना घडल्या पोलीस त्यांचा शोध घेत आहे मात्र चोरटे पोलिसांच्या हातावर नेहमी तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी होत आहेत आतापर्यंत एकाही चोरीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नाही
घरफोडीत चोरट्यांनी महिलांच्या दागिन्यांना लक्ष केले असून घरफोडी करण्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे चोरट्यांना जर बंद करणे बिटरगाव पोलिसांपुढे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे.