झाडगाव येथे कोरोना टेस्ट दरम्यान निघाले पाच पॉझिटिव्ह

प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव

राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरटीपीसीआर कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन दिनांक २ मे रोजी रविवारी जिल्हा परिषद केन्द्र शाळा येथे आयोजित करण्यात आले होते प्रशासनाने केलेल्या आवाहानाला ग्रामपंचायतिने प्रतिसाद देत गावातील ८३ नागरिकांनी पुढे येवुन कोरोना चाचणी केली असता त्या दरम्यान पाच पाँझिटिव्ह रुग्ण आढळुन आले असता त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर गावात मोठ्या प्रमाणावर तापाचे रुग्ण आढळुन येत असल्याने आरोग्य विभागाला कोरोना चाचणी गावात घेण्यासाठी आव्हान करण्यात आले होते खाजगी डॉक्टर कडुन ईलाज घेत असलेले रुग्ण कोरोणाच्या भितीने घरीच औषध उपचार करत आहेत त्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कोरोना चाचणी करावी यासाठी आव्हान करण्यात आले होते ग्रामपंचायत सरपंच बाबाराव किन्नाके मंडळ अधिकारी बाबा पोटे डॉक्टर मोरे साहेब ग्रामपंचायत सदस्य सचिन राडे पोलीस पाटील प्रशांत वाणी तलाठी अपेक्षा गाडगे ग्रामसेवक प्रविण निकोडे आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. तालुका प्रतिनिधी राळेगाव. रामु भोयर