जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरला आज दिनांक 30 जानेवारी ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री.जयंतभाऊ कातरकर अध्यक्ष शाळा समिती येरला यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना प्रार्थना गायन केली तसेच पेंदोर सर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.कुंभारे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता स्वावलंब यांच्या महत्त्व सांगितले अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय श्री.जयंतभाऊ कातरकर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली व स्वच्छता स्वावलंबन अहिंसा या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मूल्यं विषय माहिती सांगितली व ते आपण आत्मसात केले पाहिजे हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले शाळेतील शिक्षक श्री बारापात्रे सर यांनी सर्वांचे आभार मानले विद्यार्थ्यांनी चित्र व निबंध लेखन केले तर सर्वांनी मिळून शालेय परिसराची स्वच्छता केली आज घरातील स्वतःची कामे स्वतः करणे दिवसभरातील उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण याबाबत मुलांना सांगितले कार्यक्रमाला श्री अमोल रावजी तेलंग सदस्य शाळा व्यवस्थापन समिती येरला व अनिल खंडाळकर उपाध्यक्ष पेंदोर सर, पाल मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.