
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील एका वृद्ध शेतकऱ्याने विषारी किटक नाशक औषध प्राशन करून जिवन यात्रा संपवली.हि घटना मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता मंगी शिवारात घडली.
वसंता साधूजी आवारी (५५) रा.दहेगांव असं आत्महत्या करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव असून मंगी शिवारात असलेल्या स्वताच्या शेतात त्यांनी विषारी किटक नाशक औषध प्राशन केले.त्यांना उपचारासाठी करंजी येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांचेवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वडकीचे १ लाख २५ हजार रुपये व खाजगी सावकाराचे कर्ज असल्याचे कळते.त्यांचे पश्चात पत्नी एक मुलगा,सुन व नातू असा परीवार आहे.
