
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
दिनांक 10 ऑक्टोबरला सावरखेड येथे जिल्ह्यातील आदिम जमात शामादादा कोलाम संघटनेचे वरिष्ठ कार्यकर्ते तसेच निलेशभाऊ रोठे(मा.उपसभापती पं. स.राळेगाव) दिनकरजी कोंडेकार यांचे सहकारी यवतमाळ येथील विद्यार्थी संघटना चालविणारे युवा कार्यकर्ते निलेशजी पिंपरे यांची नियुक्ती आदिम जमात शामादादा कोलाम संघटना राळेगाव तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते करण्यात आली.यावेळी लेतूजी जुनगरे,वामनराव ढोबळे,राजु मुंडाली,अमित ढोबळे,मुकेश आत्राम,मनोहर मेटकर,सुरेश मुंडाली व सर्व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
