राळेगाव तालुक्यातील चहांद विविध ग्रामविकास सहकारी सोसायटी मध्ये जवादे ,व राऊत गटाचा दणदणीत विजय

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद व लाडकी येथील विविध ग्रामविकास सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जवादे व राऊत गटाने दणदणीत विजय मिळविला .
सविस्तर माहिती अशी की दी. 5/6/2022 रोजी होऊ घातलेल्या विविध ग्रामविकास कार्यकारी सहकारी संस्था चहांद येथील जाहीर निवडणूक दरम्यान अतिशय चुरशीच्या लढतीत जवादे व राऊत गटाच्या विरोधी गटाला एकही जागा मिळविता
आली नाही तर विजयी गटाने एकूण तेरा जागा मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले यावेळी उपस्थित गट प्रमुख व सर्व कार्यकर्त्यांनी गुलाल व ढोल ताशांच्या गजरात विजयी आनंद साजरा केला. यावेळी पक्ष श्रेष्ठ धनजय जवादे, किशोर जवादे, अनिल धोबे, बाळू भाऊ राऊत, शंकर राऊत, विजय बोरकुटे, राजू भाऊ चामाटे, विनोद बोरकुटे, विजय शेळके, निखिल शेळके, प्रमोद येडे, प्रकाश गवारकर,यानी कार्यकर्त्यांचे व मतदाराचे आभार मानले यावेळी निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून
ओ.एम. पहुरकर ,प्रोसेडींग अधिकारी रुपेश लाकडे, व्ही. एस. झांबरे, एस. एम. ताठे, नामदेवराव वाढई ,पंकज गावंडे, समीर तेलंग, सुभाष कौवे यांनी काम पाहिले तसेच वडकी पोलीस स्टेशन ठाणेदार विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उद्धव घुगे व महिला पोलिस अरुणा गौतम यांनी
निवडणूक दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.