राळेगाव चे सी.ओ.ची इच्छाशक्ती आणि राजाभाऊ च्या औदार्या ने जलकुंभाने घेतला मोकळा श्वास


राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी ची नैतिक जबाबदारी आहे पण केवळ याचं श्रेय विरोधकांना जाते,म्हणून राळेगांव नगर पंचायत चा ४६वर्ष जूना जलकूंभ चार वर्षा पासून कोरडा ठणठणीत होता. अखेर अकार्यक्षम लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि सी.ओ.नी यात प्रामुख्याने पुढाकार घेऊन अवघ्या दोन महिन्यात हे मुख्य काम पूर्णत्वाकडे नेले आहे.
राळेगांव शहरातून चार वर्षापुर्वी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ बी या सिमेंट रोड चे बांधकाम सुरु असताना,शहरातील जलकूंभ भरणारी मुख्य जलवाहिनी फुटली. त्या वेळी सबंधित कंत्राटदार संपूर्ण जलवाहिनी चे काम करुन देण्यास तयार होते.पण दोन्ही तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात,निष्क्रियते मुळे म्हणा की श्रेय मिळू द्यायचं नाही.म्हणून यांच्या हेकेखोरपणा मुळे की यात काही मिळणार नाही,म्हणून हे महत्त्वपूर्ण काम थांबले. याचा पुरेपुर अभ्यास करत पाठपुरावा सी.ओ.अरुण मोकळं,पाणी पुरवठा अभियंता ज्ञानेश्वर घरडे यांनी प्रशासनाकडे केला.पण जलवाहिनी च्या कामाचे कंत्राट मिळालेले शासकीय कंत्राटदार राजाभाऊ दुधपोळे यांनी शहराचे हित डोळ्यासमोर ठेवून या कामात मोठं आर्थिक नुकसान सहन करत हे संपूर्ण उत्कृष्ट काम अवघ्या दोन महिन्यात पूर्णत्वाकडे नेले.आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. जून २०२१ मध्ये या ४६ वर्ष पुरातन जलकूंभा तून पुर्ववत पाणी पुरवठा सुरु होण्याचे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहे.
फक्त स्वार्थ साधण्यात,लोकहिताला तिलांजली तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी दिली.हे काम पुनश्च्छ मार्गी लागतांना,तांत्रिक अडचणी दूर करताना जो त्रास सी.ओ.सह सर्व सबंधितांना झाला.पण जबरदस्त इच्छाशक्ती मुळे या जून्या जलकुंभाने आता मोकळा श्वास घेतला आहे हे विशेष….