
शहरातील मतदारांचा कल भाऊ आणि सर एकत्र फिरल्याने वातावरण काँग्रेसमय? आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नगर पंचायत राळेगांवची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार असून, कोणत्याही राजकीय पक्षांचा उमेदवार हा प्रभागातीलच असावा, बाहेरच्या प्रभागातील उमेदवार आमच्या वर लादू नये, बाहेरील पार्सल नकोचं असाच मतप्रवाह सतरा प्रभागातील मतदारांचा चर्चेअंती निदर्शनास येत आहे. काल दिवसभर काँग्रेस पक्षाचे सर आणि भाऊ नी बारा प्रभाग फिरुन जनमनाचा कौल घेत, प्रमुख कार्यकर्ता मंडळी सोबत सखोल चर्चा करून योग्य, पक्षनिष्ठ,उमेदवार कोण राहील याची चाचपणी केली,खूप वर्षांनी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ता मंडळी रस्त्यावर उतरल्याने,राजकीय वातावरण सध्या काँग्रेस पक्षाचे बाजूने वळत असल्याचे चित्र काल दिसले. आजी माजी आमदारांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून भाजपाचे विद्यमान आमदार काँग्रेस पक्ष बंडखोरांची आतुरतेने वाट पाहत आहे पण मात्र समोर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव सोसायटीच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सह उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागोपाठ असल्याने काँग्रेस पक्षा मधील बंडखोरी याची शक्यता धूसर होत आहे असे स्पष्ट मत राजकीय निरीक्षकांचे आहे शिवसेना मनसे आप सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ता मंडळीसाठी नगरपंचायत राळेगाव ची निवडणूक एक सुवर्ण संधी असून आतापर्यंत केलेली कामे, आपली जनमानसात काय प्रतिमा आहे ? हे दाखविणारी असणार आहे हे विशेष
