
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा बेलोरा येथील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन आदर्श शिक्षक अरुण हरिदास राठोड वय 55 वर्ष रा. जवळा याचे विरुद्ध अपराध क्रमांक 404/2021 कलम 376 (2) (एन) (एफ) भादंवि कलम 4/6 पोक्सो अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळे मधील आदर्श शिक्षक अरुण हरिदास राठोड याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला अभ्यास कसा करायचा व मी सांगितल्या प्रमाणे अभ्यास करशील तर तुला चांगले मार्क मिळतील असे आमिष दाखवून पिडीत मुलीला रोज वर्ग सुटल्यावर थांबून घेत होता व पिडीताच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्यासोबत जवळीक साधुन मागील दोन महिण्यापासून जिला परिषद शाळा बेलोरा येथील वर्ग खोली मध्ये जबरदस्तीने वारंवार जबरी संभोग करत होता. या प्रकरणी आज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर बी. जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करुन पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे. पिडीत मुलगी ने नुकतीच दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण केली होती. या अल्पवयीन मुलीला कोरोना काळात शाळेत बोलवून आदर्श शिक्षक अरुण हरिदास राठोड शिक्षण देत होता. अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेम पाशात ओढून शाळबाह्य मुलीला शिकविण्याच्या त्या नराधाम शिक्षकाचा खरा उद्देश उघड झाल्याने जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीतच संतप्त जमावाने बेदम बदळून काढले आणि पोलीसांना पाचरण करुन पोलीसांच्या हवाली केले. सदर कीळसवाना प्रकार समाजामध्ये झळकतात बेलोरा परिसरात तिव्र संतापाची लाट पसरली असून शिक्षकाचा अल्पवयीन मुलीचे लचके तोडण्याचे कारनामे उघड झाल्यामुळे पोलीसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून पुढील तपास कार्याला प्रारंभ केला आहे.
