विदर्भवादी लोकांनी केले विदर्भाचे झेंडे हातात घेऊन केले धुलीवंदन……!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

सामाजिक रूढी परंपरा, आणि धार्मिक संस्कृती चे जतन करण्यासाठी “‘वैदर्भीय धुलिवंदन”‘ वैचारिक सभा घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती कार्यालयात रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे.

“‘ वैदर्भीय धुलिवंदन वैचारिक सभा”‘ चे अध्यक्ष मा.कृष्णाजी भोंगाडे, मार्गदर्शक मा.गोविंद चव्हाण कोअर कमिटी सदस्य मा.मधुसुदन कोवे गुरुजी उपस्थित होते वसंत पंचमी साजरी साजरी करतांना ७ एप्रिल २०२२ला दिल्ली येथे जंतर मंतर वर जाऊन विदर्भातील सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक सन उत्सव, रुढी परंपरा दिल्ली दरबारी दाखवणार आहे.आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.अध्यक्षिय भाषणात मा कृष्णा भोंगाडे यांनी “‘वैदर्भिय धुलिवंदन”‘ कार्यक्रमांत आपण विदर्भवादी आहोत विदर्भाचा स्वाभिमान आपण जोपासत आहो परंतु राज्य सरकार विदर्भातील लोकांना सावत्र पणाची वागणूक देत आहे केंद्र सरकार आपली मागणी आहे की आम्हाला महाराष्ट्रातुन मुक्त करा आणि हक्काचं विदर्भ राज्य द्या असे मतं व्यक्त केले आहे.”‘वैदर्भिय धुलिवंदन वैचारिक सभा”‘ मध्ये सहभागी अशोकराव कपिले, प्रल्हाद काळे, दिवाकर भोयर, श्रीधर ढवस, नितीन ठाकरे, सोनाली मरगडे, शंकर माळवे,समिर शिंदे, आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती चे अनेक सदस्य उपस्थित होते.