
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत भांब व एकबुर्जी येथे मंगळवारला जल जीवन मिशन अंतर्गत चर्चा करण्यात आली.सोबतच नवीन सार्वजनिक स्वचालयाची पाहणी करण्यात आली.यावेळी पं, स गटविकास अधिकारी रविकांत पवार,जी,प गुलाने सर,बेहरे,साहेब,निंबाळकर साहेब हजर होते,यावेळी जल जीवन मिशन अंतर्गत चर्चा करून गावच्या सरपंच माधुरी झाडे,उपसरपंच विजय कोल्हे,ग्रा,पं,सदश्य नितीन झाडे,धरती कोवे,यांनी जल जीवन मिशन बद्दल सहभाग नोंदविला ह्यावेळी ग्रा,पं कर्मचारी तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
