
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यांतील नवोदय क्रिडा मंडळ व यवतमाळ येथील शिवाजी क्रिडा मंडळाच्या खेळाडूंची अमरावती विद्यापीठ हॉलीबॉल संघात निवड झाली आहे त्यामध्ये राळेगाव येथील राजीव गांधी महाविद्यालयातील नवोदय क्रिडा मंडळाची खेळाडू मयुरी दिपक चौधरी तर यवतमाळ येथील शिवाजी क्रिडा मंडळाचे खेळाडू व s p m गिलानी कॉलेज घाटंजी येथे शिक्षण घेत असलेले खेळाडू कु श्रुतिका सोईटकर, कू कोमल रोंघे, कू पुजा महाजन व पियूष जांभूळकर यांची निवड झाली आहे. पहिल्यांदाच येवढ्या मोठया प्रमाणात अमरावती विद्यापीठ हॉलीबॉल संघात निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खेळाडूंना क्रिडा शिक्षक पवार सर,सौरभ माकडे व मनोज येंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच हॉलीबॉल संघटनेचे जिल्हा सचिव अतुल नेवारे व राळेगाव येथील नवोदय क्रिडा मंडळाचे व राळेगाव साप्ताहिक राळेगाव नगरीचे संपादक महेश भोयर यांचे सुधा मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या निवडीने राळेगाव येथील नवोदय क्रिडा मंडळ व यवतमाळ येथील शिवाजी क्रिडा मंडळाच्या खेळाडूंच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
