

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
बीत गये अब कितने दिन,कब आएंगे अच्छे दिन! मोदी सरकार मुर्दाबाद ! भाजपा सरकार मुर्दाबाद ! ” पेट्रोल दरवाढ मागे घ्या!” अश्या जोरदार घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,युवक काँग्रेस राळेगाव तालुका व शहर काँग्रेस तर्फे करण्यात आला.
पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सामान्य जनता हवालदिल झालेली आहे.सामान्य माणसाचे कौटुंबिक बजेट ढासळले आहे,आधीच कोरोना महामारीचे थैमान माजवले असून केंद्र सरकारने इंधनाचे भाव सुद्धा माजवले आहेत, तरीही केंद्र सरकारला याबाबद्दल काहीही वाटत नाही यावरून त्यांचा सत्तेचा मस्तवालपणा व अनास्था स्पष्ट दिसून येते,सत्तेत येताना महागाई वर बोललेले सरकार यावर काहीच बोलतांना दिसत नाहीत,हेच का यांचे अच्छे दिन ? असा सवाल सामान्य विचारत आहे.मोदी सरकार फसवे,खोटे भ्रष्टाचारी असंवेदनशील व विश्वासघाती ठरले आहे.
इंधन दरवाढीचा परिणाम बाजारातील इतर वस्तूंच्या दरावर होतो,इंधन दरवाढ ही महागाईची जननी आहे.आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही सरकार तेलाच्या काही किंमंती कमी करत नाहीत,यावरून सरकारची नफेखोरी दिसते,म्हणून तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी यवतमाळ जिल्हा प्रवक्ता अरविंद वाढोनकर,तालुकाध्यक्ष अरविंद फुटाणे,शहरअध्यक्ष प्रदीप ठुने,प्रकाश पोपट, अफसर अली सय्यद, राजुभाऊ नागपुरे, अरविंद तामगाडगे,बंडू भाऊ लोहकरे, सचिन उरकुंडे,निलेश हिवरकर,निलेश पिंपरे, शुभम चिडाम, प्रशिक भोंगाडे,सागर वनसकर,अक्रम खान,प्रतीक एड्सकर,शुभम वनकर,प्रशिक कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
