
.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
१५ऑगस्ट दिनी सावरगाव वासियांकरिता स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावरगाव परिसरातील जनतेला एक अपूर्व अदभुत सोहळा अनुभवास मिळाला तो असा की वसंत शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव चे वतीने आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सव वर्ष साजरा करताना ग्रामपंचायत सावरगाव, पशु वैद्यकीय सेवा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामविविध सहकारी सोसायटी, तसेच वरिष्ठ प्राथमिक शाळा, या सर्व ठिकाणी एकाच वेळीं ध्वजरोहन व राष्ट्रगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात ग्रामपचायतीतर्फे तर्फे सरपंच मा. श्री. शशिभाऊ देशमुख यांचे हस्ते ध्जारोहण करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ ढोले यांचे हस्ते पशु वैद्यकीय केंद्र येथील ध्वजारोहण केले,ग्रामविविध सहकारी सोसायटी चे ध्वजारोहण अध्यक्ष श्री निलेश बोभाटे यांनी केले तर प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ श्री मुनेश्वर साहेबांनी ध्वजारोहण केले त्याचप्रमाणे वरीष्ठ प्राथमिक शाळा येथिल ध्वजारोहण मुख्याध्यापिका सौ सोयाम यांनी केले हे सर्व ध्वजारोहण एकाच वेळीं करण्यात आले.हा अविस्मणीय क्षण एक किमी परिघातील सर्व उपस्थित नागरिकांना अनुभवायला मिळाला तसेच सहभाग घेतला.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रविण भाऊ देशमुखांची आहेत.त्यानंतर कार्यक्रमांचा समारोप नेहरू विद्यालय सावरगाव येथे वसंत शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव च्या अध्यक्ष्या मा.श्रीमती, विद्याताई विनायक राव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी्माजी पर्यवेक्षक श्री साकरकर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री किशोर भाऊ जगताप, श्री कृष्ण कुमार नित माजी सैनिक श्री,भोंग सर, श्री चिंधुजी भोयर, श्री मोहन भाऊ फाळके , श्री आनंद भाऊ कांबळे, श्री पुरुषोत्तमराव ढोले,हे होते तर व कार्यक्रमांचा समारोप करण्यात आला.याकरीता सावरगाव येथील ग्रामस्थांनी तसेच समता क्रिडा मंडळ, साईनाथ भजनी मंडळ, सिद्धार्थ भजनी मंडळ, निरंकारी सत्संग मंडळ, समता बाल गणेश मंडळ व सर्व महिला बचत गट तसेच नेहरू विद्यालय सावरगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रांतीकारक यांच्या वेशभूषा करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी निर्माण केली.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रमांचा समारोपप्रसंगी बोलताना श्री प्राचार्य श्री वनस्कर सर यांनी प्रविण भाऊ देशमुखांची काम करण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती दिली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तुषार देशमुख यांनी केले.संचलन श्री शेंडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनील जगताप सर यांनी केले. करण्यात आला.
