राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त करंजी( सो) येथे साजरा करण्यात आला


राळेगाव तालुका प्रतिनिधी : रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दीन करंजी सोनाबाई येथे पक्षाच्या पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. या प्रसंगी करंजी ग्रामपंचायत ला कोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेता ग्रामवासीयांना मास्क व सॅनिटायझर पक्षाच्या वतीने देण्यात आले, सोबतच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच प्रसाद भाऊ ठाकरे यांचा पक्षाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.फिडेल बायदाणी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शहर अध्यक्ष प्रकाश खुडसंगे, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया प्रसाद ठाकरे, सेवादल तालुका अध्यक्ष गीरीधरराव ससनकर सर, तालुका उपाध्यक्ष वसंत पोटफोडे, रऊफ शेख, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मुर्तुझा बब्बर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चारूदत्त पाटिल, शहर अध्यक्ष निखिल कारडवार, विद्यार्थी तालुका अध्यक्ष अजिंक्य वैद्य, तेजस ठाकरे, जिल्हा चिटनिस दिलीपराव नरुले, किसनाजी देशमुख, तालुका चिटनिस संजय धूपे, प्रदिप पिंपरे या सह कार्यकर्ते उपस्थित होते.