स्वॅप थिंक टॅंक सावरखेड तर्फे आमदार चषकाचे आयोजन 🏏(टेनिसबॉल क्रिकेट चे खुले सामने)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सावरखेड दि.21 स्वॅप थिंक टॅंक सावरखेड यांच्या तर्फे प्रा.डॉ. श्री. अशोकरावजी उईके सर (आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्र)यांच्या जन्मदिनानिमित्य आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.दि.1 जानेवारी 2022 ला आमदार चषकाचे उदघाटन प्रा.डॉ.श्री.अशोकजी उईके सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .टेनिसबॉल क्रिकेट चे सर्व सामने स्व.तुकारामजी चौधरी क्रीडा नगरीतील ग्रीन पार्क स्टेडियम येथे खेळविण्यात येणार आहे.विजेत्या संघाना प्रथम बक्षीस आमदार चषक व 25000 हजार रुपये,द्वितीय बक्षिस 15000 व स्मृतिचिन्ह ,तृतीय बक्षीस 10000 रुपये व स्मृतिचिन्ह ,चतुर्थ बक्षिस 5000 रुपये व स्मृतिचिन्ह तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे,सर्व संघांनी या आमदार चषकामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन स्वॅप थिंक टॅंक सावरखेड तर्फे अध्यक्ष प्रविणभाऊ चिडाम,उपाध्यक्ष हर्षलभाऊ चौधरी,सचिव निखीलभाऊ नेहारे,कर्णधार मनोजभाऊ मेश्राम यांनी केले.