
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
काही महिन्यापूर्वी मंगेशजी शंकर बोदाणे या शेतकऱ्याने नापिकीस कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या मागे त्यांची पत्नी सुरेखा बोदाने, त्यांचा मुलगा व म्हातारे आई वडील आहेत. घरची परिस्थिती हालाकीची असून आता आर्थिक हातभार लावण्यास कोणीच नाही. ह्या परिस्थितीला जाणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून सुरेखा यांना मिशन उभारी प्रकल्पाअंतर्गत शिलाई मशीन भेट देण्यात आली. या मदतीमुळे त्यांना रोजगार उपलब्ध होईल व उपजिविकेस हातभार लागेल.
या कार्यक्रमास श्री. अमरजी गजभिय – व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक यवतमाळ, श्री. चंद्रशेखरजी कारेकर शाखा व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया वडकी, अखिल गजभिये सहाय्यक व्यवस्थापक, क्षितिजाताई डोकरास कर्मचारी, मनीषाताई आदे- भरारी महिला क्लस्टर मॅनेजर, तसेच महिला सबलीकरणासाठी सतत कार्यरत असणाऱ्या सौ. विद्याताई मोहनभाऊ लाड उपस्थित होत्या.
