
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
तालुक्यातील जळका शिवारातील मझरा कॅनल वर जीवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने महिला गंभीर। जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज (दी.23) घडली. या महिले सोबत शेतात जाणाऱ्या कुत्र्याचा मात्र विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या मुळे वीज वितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वसंता सायडू पवार यांचे मझरा कॅनल ला शेत लागून आहे. येथून रुकसा जमीना भोसले ही महिला तिच्या शेतात लावणी करीता जात होती. या ठिकाणी जीवंत विद्युत पोल वरील तारेचा स्पर्श होऊन सोबतचा कुत्रा जागीच ठार झाला. तर सदर महिलेला विजेचा धक्का बसून ती गंभीर जखमी झाली.या महिलेला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ ला पाठविण्यात आले. काल पासून कॅनल लगतच्या शेतात जीवंत वीज असणारे पोल पडून असणे ही गंभीर बाब आहे. व राळेगाव तालुकात अनेक ठिकाणी विजेचे तार व पोल झुकलेले आहे . झोपलेल्या अधिकाऱ्यांनीजागे होवून लाईनमन ला कोणत्या कोणत्या गावात व शेत शिवारात विचारपूस करावी. नाहीतर आता फक्त कुत्रा मेला नाहीतर व्यक्ती सुद्धा मारू शकतील . वीज वितरण च्या या गलथान कारभारा बाबत सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे.
