
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक २४/१२/२०२१ रोज शुक्रवारला वर्ग १२ वी कडून राष्ट्रीय ग्राहक दिनांचे आयोजन करण्यात आले होते. या ग्राहक दिनी सर्व प्रथम विद्यार्थ्याना एकत्र बसवून ग्राहकदिनाबद्धल वर्ग शिक्षिका सौ कुंदा काळे यांनी प्रास्ताविकाद्धारे पटवून दिले.त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाची सविस्तर माहीती सांगीतली, बोलताना ग्राहक हा काळाची गरज असल्याचे सांगितले.त्यानंतर वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी लावलेल्या स्टावरील मेनूचे ग्राहक बनून विकत घेऊन आनंद लुटला.त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते हा सर्व कार्यक्रम सोशल डिस्टनिंगचा वापर करून साजरा करण्यात आला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.
