सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा :गुरुदेव सेवा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन


राळेगांव तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर

शेतकरी हा या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे व देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य घटक आहे पण यावर्षीच्या अति मुसळधार पावसामुळे तो पूर्णतः खचला आहे तो पूर्णपणे समस्याग्रस्त झालेला आहे. श्री तुकडोजी महाराजांच्या विचाराप्रमाणे शेतकरी हा या जगाचा पोशिंदा आहे त्याला बळ देणे महत्त्वाचे आहे कारण आज जर आपण त्याला आर्थिक बळ देणार नसेल तर तो पूर्णपणे खचून जाईल, हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यावर आज पूर्णपणे आर्थिक संकट ओढवलेले असताना शासकीय मदत ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली पाहिजे व सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून त्याला शासनाकडून योग्य ती मदत मिळून दिली पाहिजे किंवा झाली पाहिजे यासाठी तालुका गुरुदेव सेवा मंडळ राळेगाव च्या वतीने तहसिलदार डाॅ रविंद्र कानडजे राळेगाव यांना निवेदन देण्यात आले.
अनेक गावात नदी नाल्यांचे पूर घुसल्याने अनेक शेतात अजूनही पाणीच पाणी दिसत आहे स्वतःच्या डोळ्यात पाणी साठवून शेती असणाऱ्या या बळीराजाला हाच खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे ती शासनाने मिळवून द्यावी यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा व या देशाच्या पोशिंदाला या संकटाच्या विळख्यातून काही प्रमाणात का होईना मुक्तता व्हावी यासाठी तालुका गुरुदेव सेवा मंडळ सर्वतोपरी सहकार्याच्या भूमिकेत आहे. हे निवेदन देता वेळी डॉ. ज्ञानेश्वर राव मुडे साहेब, हरिदास कुबडे ,रुपेश रेंगे, गणेश राव फटिंग अरविंद चांदेकर ,जीवन भाकरे, सुभाष चव्हाण ,सुभाष खडसे, कुणाल अक्कलवार ,हर्षल लांबाडे, शंकर लांबाडे ,नरेश देशमुख , प्रमोद तोडगे, इत्यादी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.