
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी मध्ये सर्व गुणवंत लोकांचा भरणा आहे , डॉक्टर स्व तः शिक्षित होऊन समाजातील रोगराई नाहीशी करण्यासाठी प्रयत्न करतात असे असताना व्यसनामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते समाजाचे नुकसान टाळायचे असल्यास नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन माजी शिक्षण मंत्री प्रा वसंतरावजी पुरके यांनी केले नगरपंचायत कार्यालय व लॉयन्स क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटी यांचे संयुक्त विद्यमाने साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले होते यावेळी उडघाटक म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा वसंतरावजी पुरके बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष रवींद्रजी शेराम तर प्रमुख पाहुणे म्हणून राजे मुधोजी भोसले, यशोधराराजे भोसले ,जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड प्रफुल्लभाऊ मानकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, काँग्रेसओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष अरविंदभाऊ वाढोनकर,नगरपंचायत उपाध्यक्ष जानरावभाऊ गिरी ,तालुका शिवसेना प्रमुख विनोदभाऊ काकडे,काँगेस शहराध्यक्ष प्रदीप भाऊ ठुने, शिवसेना शहरप्रमुख राकेश राऊळकर ,लॉयन्स कलबचे अध्यक्ष अजय सिंग,डॉ नरेश गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी शहरातील अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याशेजारी वृक्षारोपण करण्यात आले तर ,लॉयन्स कलब ऑफ ग्रीन सिटीच्या वतीने नगरपंचायत मध्ये रोगनिदान शिबीर व रक्तदान शिबिर घेण्यात आले ,तसेच सीबीएसई दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही यावेळी घेण्यात आला राजे मुधोजी भोसले यांनी यावेळी लॉयन्स क्लबची माहिती दिली व भविष्यातही अश्याच प्रकारचे रोगनिदान शिबिर राळेगाव येथे आयोजित करू असे सांगितले तर पुरके सरांनी राजेंनी राजकारणात येऊन समाजकारण करावे कारण राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे असे सांगितले यावेळी ऍड प्रफुल्लभाऊ मानकर,राजेंद्र गायकवाड यांचीही भाषणे झाली रोगनिदान शिबीर तसेच रक्तदानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश काळे यांनी प्रास्ताविक मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष जानरावभाऊ गिरी यांनी केले.
