
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ऊस तोड कामगारांच्या मजुरीचे पैसे घेवुन जाताना अज्ञात दरोडेखोरांनी दुचाकी अडवुन रोख चोरून नेल्याचा बनाव करणाऱ्या मुकदमासह चार आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.
२९ ऑक्टोबर २०२१ रोजी नामे अजय राजु तायकोटे (२७) रा. सावरगड, ता.जि. यवतमाळ याने पोलीस स्टेशन बडगांव जंगल येथे हजर येवून तक्रार दिली की, तो व त्याचा साळभाउ मोटर सायकलने उस तोडणी कामगारांना अॅडव्हान्स म्हणुन देण्यासाठी साळभावाने दिलेले ३,२०,०००/- रु घेवुन १२:०० वा चे सुमारास अकोलाबाजार ते तळणी रोडने पेट्रोल पंपाचे समोर मोटर सायकलने जात असता जंगलाचे रोडवर सहा अज्ञात इसमांनी दोन मोटर सायकवर येवुन तीन इसमांनी फिर्यादीस व तीन इसमांनी फिर्यादीचे साळभावास अडवुन खाली पाडुन फिर्यादीचे जवळील ३,२०,०००/- रु असलेली बॅग हिसकावून पळुन गेले अशी तक्रार दिल्याने पोलीस स्टेशन बडगांव जंगल येथे कलम ३९५ भा.दं. वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी सदर घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्या बाबत आदेश अपर पोलीस अधीक्षक व तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी व स्थागुशाचे पथकाला दिले होते.
सदर गुन्हयात डॉ. खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह घटनास्थळ गाठत फिर्यादी व त्याचे साळभावास गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता फिर्यादीची देहबोली व त्याचे बोलण्याचे पध्दती मध्ये तफावत आढळुन आली. त्या अनुषंगाने स्थागुशाचे पथकाने फिर्यादीस तपास कौशल्याचा व इंन्ट्रॉगेशन कौशल्याचा वापर करून विचारपुस केली असता फिर्यादी यानेच त्याचा भाउ व यवतमाळ येथील मीत्राचे मदतीने दरोडयाचा बनावाचा कट रचुन गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. घटनास्थळावरुनच अपर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे फिर्यादीला ताब्यात घेवुन ईतर साथीदारांचा शोध घेतला असता पोलीस स्टेशन वडगांव जंगल स्थानिक गुन्हे शाखा चे पथकांनी तसेच अवधुतवाडी येथील डि बी. पथकाचे सहायाने पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केले असुन उपरोक्त गुन्हयात दोन आरोपी फरार असुन त्यांचा शोध सुरु असुन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
