सावली( वाघ)येथे कार्यसम्राट आ.समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

           

गावाच्या विकासकामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असून कोणत्याहीवेळी मी आपल्या सेवेत तत्पर राहिल असे आश्वासन कार्यसम्राट आमदार समिसमिरभाऊ कुणावार यांनी सावली येथील आगे बढ़ो व्यायाम शाळेच्या लोकार्पण समारोहाचेवेळी सावली(वाघ) जि.प.मतदारसंघातील गावकऱ्यांना दिले.
काल दि.६ रोजी सावली (वाघ) येथील आगे बढो व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा सावली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता,याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिनभाऊ मडावी,सरपंचा सौ.छायाताई सुभाषराल राऊत,प.स.सदस्या सौ.मंजूषाताई ठक,उपसरपंच अनिलराव ठक तसेच आगे बढो व्यायाम शाळेचे अध्यक्ष विनोदराव विटाळे इत्यादि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे फीत कापून रितसर लोकार्पण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सावली(वाघ) जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितिनभाऊ मडावी यांनी मतदारसंघात कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे प्रयत्नाने अनेक विकासकामे करता आली असून कार्यसम्राट आमदार कुणावार मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन केले.