राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दि २४-१०-२१ रोजी राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.भविष्यात होणाऱ्या नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी च्या अनुषंगाने पक्ष कार्यकर्त्याना पक्ष बळ देण्यासाठी, व तालुक्यातील स्थानिक पदाधिकार्यांचा पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी सदर आढावा बैठकीचे नियोजन माजी आमदार संदीपभाऊ बाजोरिया , आ. इंद्रनील नाईक साहेब , जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कामारकर(पाटील),यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ,शहर अध्यक्ष प्रकाशभाऊ खुडसंगे,सोशल मिडिया जिल्हा अध्यक्ष प्रसादभाऊ ठाकरे यांनी राळेगाव तालुक्यामध्ये बैठकीचे आयोजन केले..यावेळी पक्षाचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब कामारकर (पाटील) , महिला जिल्हाध्यक्षा सारिकाताई ताजने मॅडम, युवक जिल्हाध्यक्ष राहूलभाऊ कानारकर ,युवती जिल्हा अध्यक्ष शितल कुरटकर , यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील शेकडो नामवंत कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका प्रवक्ते ताणबाजी चिंचोळकर यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अजिंक्यभाऊ वैद्य यांनी केले
.