राळेगाव तालुक्यातील माजी उपविभाग सचिव कु. आरतीताई कारंडे यांची ठाणे येथे विभागीय बदली झाली त्यामुळे त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

आज दिनांक ०६/०८/२०२१ रोजी मा‌. श्री बाळकृष्णाजी गाढवे साहेब केंद्रीय अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी व मंडळ अधिकारी समन्वय महासंघ यांनी राळेगाव तालुक्याला सदिच्छा भेट देवुन सदस्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व मार्गदर्शन केले त्या वेळी श्री सानप साहेब मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष , श्री विनोद अक्कलवार जिल्हा सहसचिव विदर्भ पटवारी संघ, श्री मोहन सरतापे पटवारी पतसंस्थेचे संचालक ,श्री अभय देशपांडे मंडळ अधिकारी नेर , श्री. गावडे साहेब तलाठी, श्री माहुरे साहेब तलाठी नेर व उपविभाग सचिव स्वाती इंगोले , श्री विनोद वाढोणकर माजी जिल्हा उपाध्यक्ष, श्री चिडे साहेब माजी उपविभाग अध्यक्ष व मं.अ. श्री वाघ साहेब,मं. अ. श्री गोटे साहेब, मं.अ‌. श्री कर्नेवार साहेब, मं.अ श्री. कनसे साहेब, मं. अ. श्री. निनावे साहेब व मोठ्या संख्येने तालुक्यातील तलाठी बंधू भगिनी उपस्थित होते. त्यावेळी मा. गाढवे साहेब यांनी राळेगाव तालुक्यातील माजी उपविभाग सचिव कु. आरतीताई कारंडे यांची ठाणे येथे विभागीय बदली झाली त्यामुळे त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कोतवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. श्री गाढवे साहेब यांची भेट घेवून गाढवे साहेबांचा सत्कार करण्यात आला.
“संघशक्ती कल युगे
हमारी संघटना हमारी
ताकद”