
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
प्लॅस्टिक मुक्त भारत हि संकल्पना प्रत्यक्षपणे राबविण्यात यावी म्हणून नेहरु युवा केंद्र संघटन यवतमाळ तथा क्रीडा मंत्रालय यांच्या माध्यमातून तालुका समन्यविका कु. सपना सुखदेव वानखेडे यांनी दि. २१/१०/२०२१ रोजी आर्णी बस स्थानक प्रमुख विश्वास देवतळे यांना बस स्थानक परिसरातील ३० किलो प्लॅस्टिक पिशव्या निर्मुलन करण्यासाठी प्रत्येक्ष भेटुन बस स्थानक परिसरातील प्लॅस्टिक बस स्थानकातील स्वच्छ क बबलु रणखांब व कविराज यांच्या माध्यमातून प्लॅस्टिक पिशव्या गोळा
केल्या यानंतर संपुर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातुन प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात येईल व त्याची विल्हेवाट लावण्यात येईल आता आर्णी तालुकाच प्लॅस्टिक मुक्त करण्याचा मनोदय
कु सपना वानखेडे तालुका समन्वय नेहरु युवा केंद्र यांनी आपले मनोदय व्यक्त केले यावेळी बसस्थानक प्रमुख विश्वास देवतळे, खुशाल पवार,शेख ताज , कविरज राठोड, बबलु रणखांब, आणी शाळकरी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
