
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामु भोयर (9529256225)
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कुंभा ते दहेगाव रोडणी अवैद्य दारूच्या पेट्या घेऊन मोटरसायकल नि जात असलेल्या 2 संशयित आरोपीना वडकी पोलीसांनी पाठलाग करत त्यांना रंगेहात पकडले
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार दि 25 जून रोजी रात्रीचे दरम्यान कुंभा ते दहेगाव रोडणी निवास चंदू घोसले वय 31 वर्ष व दुसरा सयेंद्र जसुन पवार वय 38 वर्ष रा पारधी बेडा दहेगाव हे दोघेही मोटरसायकल क्र एम एच 34 इ 4934 ने दारूच्या पेट्या घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांनी मिळाली माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव सह पोलीस कर्मचारी विक्की धावर्तीवर,विलास जाधव यांनी पाठलाग करत कुंभा ते दहेगाव रोडणी मोटरसायकल नि जात असलेल्या दोन्ही आरोपीना देशी दारूच्या सीलबंद पेट्या समवेत रंगेहाथ पकडले त्यांचेकडून देशी दारू संत्रा कंपनीचे सीलबंद 48 पव्वे 2880 रु तसेच हिरो होंडा मोटरसायकल की 15 हजार रु असा एकूण 17 हजार 880 रुपयांच्या मुद्देमाल मिळून आला असून दोन्ही आरोपीना वडकी पोलीस स्टेशनला आणून त्यांचेवर दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून ही कारवाई वडकी पोलीस स्टेशनचे ठानेदार विनायक जाधव सह पोलीस कर्मचारी विलास जाधव सह विक्की धावर्तीवर यांनी केली असल्याचे पोलीस सूत्रांकडून आज दि 27 जून रोजी माहिती देण्यात आली आहे.
