ते आले, त्यांनी पाहिलं अन ते गेलें, दुसरे आलेही नाही [ ना. अजित दादांच्या दोऱ्यातून ठोस काही हाती लागण्याची अपेक्षा ]

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपुन काढले. 9 जुलै ला धो -धो पाऊस कोसळला. 175 मी. मी विक्रमी पावसाची नोंद झाली. 17 व 18 जुलै ला पुन्हा मुसळधार पावसाने संततधार हजेरी लावली. तालुक्यातील 11 गावे पुराखाली गेली. हजारो हेकटर जमिनीतील पिके खरडून गेली. जिल्हाधिकारी, आमदार, माजी मंत्री यांचे सह स्थानिंक प्रशासनाने भेटी दिल्या. आज [ 29 जुलै ] रोजी राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांनी तालुक्यातील नुकसान ग्रस्त काही गावांना भेट दिली. अनेकांनी त्यांच्या कडे सरसकट मदत देण्यासाठी ठोस प्रयत्न करा या मागणीचे निवेदन दिले. दादांच्या कामाची एकदंर पद्धत पाहता ते शब्दाला जागतात हा पूर्वानुभव आहे. त्यांच्या या दोऱ्याची फलनिष्पत्ती आर्थिक मदतीत व्हावी अशी रास्त अपेक्षा राळेगाव तालुक्याला आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री राळेगाव तालुक्याच्या सिमें पर्यंत वर्धा जिल्ह्याच्या टोकावर आले पन त्यांनी राळेगाव तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली.
ना. अजितदादा पवार यांचे सह अमोल मिटकरी, अनेक पदाधिकारी, अधिकारी आदींनी नुकसान ग्रस्त गावाची पाहणी केली. झाडगाव, दापोरी परिसराला त्यांनी भेट दिली. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, सरपंच संघटना, नगरपंचायत आदि सह विविध संघटनानी न्याय मागण्याचे निवेदन दादांना दिले. राळेगाव तालुक्यात एकीकडे पुराने शेतातील पीक, खते वाहून गेलें. शेती खरडून गेली. तर दुसरीकडे 11 गावात नदी व नाल्याचे पाणी शिरल्याने घरातील साहित्य वाहून गेलें. अनेकांचा तर संसारच या पुरात वाहून गेला. ही हानी भरून निघणारी नाही. तेव्हडी मदत कुणी करुही शकणार नाही. मात्र सरसकट शेतकरी व नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळणे हे महत्वाचे आहे.
विरोधी पक्षनेता हे मोठे पद आहे. विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री असतो असे लौकिकार्थाने म्हटल्या जाते. शासनाकडे ठोस पाठपुरावा करून राळेगाव तालुक्यातील नागरिकांना मदत मिळावी असे प्रयत्न दादांनी करावे अशी येथल्या नुकसानग्रस्त नागरिकांची मूक मागणी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना वाचण्याचा वेळ या दौऱ्यात दादांना पदाधिकारी, अधिकारी यांच्या गराड्यात मिळाला कीं नाही कल्पना नाही. मात्र ही सार्वत्रिक भावना आहे. हा दौरा ते आले त्यांनी पाहिले व ते निघून गेलें असा औपचारिक होऊ नये ही अपेक्षा.

वाढीव गावठाण या महत्वाच्या विषयाचा पुढाऱ्यांनासर

राळेगाव तालुक्यात पूरग्रस्त गावाचे सर्वाधिक नुकसान हे नाल्याच्या पुराने झाले. नदीला पूर आला कीं नाल्याचे पाणी नदीपात्र आपल्यात सामावून घेत नाही. त्या बॅक वॉटर मुळे गावात पाणी शिरते. यात नाल्याकाठी असणारी घरे सर्वप्रथम बुडतात. लोकसंख्या वाढली कीं गावाची जमीन अपुरी पडायला लागते. वाढीव गावठाण पडत नाही. दर दहा वर्षांनी वाढीव गावठाण मंजूर करण्याचा नियम आहे. पण कुणी जागा देतं नाही, गावकरी उदासीन असतात कुणी पुढाकार घेत नाही. या अडचणी मुळे वाढीव गावठाणा हा विषय मागे पडतो. राळेगाव तालुक्यातील ज्या घरांचे नुकसान झाले त्यातील बहुतांश घरे ही नाल्या लगतची आहे. नाइलाजास्तव नागगरिकांना त्या ठिकाणी राहावे लागते. माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी या महत्वाच्या विषयाला वाचा फोडली. काँग्रेस च्या वतीने या मागणीचे प्रतिबिंब निवेदनात उमटेल अशी अपेक्षा होती पण ते झाले नाही. वास्तविक राज्यस्थरावरून दादा सारख्या तगड्या नेत्याने या प्रश्नांचा पाठपुरावा केल्यास हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. राळेगाव तालुक्यात हे प्रत्यक्ष घडले. या चुकीची किंमत येथील नागरिकांना भोगावी लागली. हे ढळढळीत दिसतं असतांना. या कडे ना. अजितदादा पवार यांचे लक्ष वेधण्याचा मात्र तालुक्यातील पुढार्यांना विसर पडला.