तुपटाकळी येथे वीज पडून बैलांचा मृत्यू

राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस तालुक्यातील तूपटाकळी शेत शिवारामध्ये दुपारी चार वाजता चे दरम्यान श्रीराम चंपत ढोरे यांचे शेतामध्ये झाडाखाली बांधून असलेल्या दोन बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
श्रीराम ढोरे व त्याचा मुलगा हे शेतकरी आपल्या शेतामध्ये बैल जोडी व गाय आणि वासरू झाडाखाली बांधून खाजगी कामासाठी आपल्या मुलासह पुसद येथे गेले असता 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान तुपटकळी शिवारात काही भागात विजेच्या गडगडतासह पाऊस झाला यादरम्यान झाडाखाली दोन बैल गाय व वासरू बांधून होते त्यात वीज पडल्याने दोन बैल जागीच ठार झाले तर गाय व वासरू काही अंतरावर असल्याने विजेचा किरकोळ फटका असल्याची शेजारील शेतकऱयांकडून माहिती मिळाली आहे.