कळंब तालुक्यातील २०२० चे विमा रक्कम अद्याप जमा झाली नाही- वसंत पुरके (माजी शिक्षण मंत्री)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

२०२०च्या हंगामात सतत पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुसकाणझाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी इफको टोकियो या पीक विमा कंपनीला पूर्व सूचना देऊन कळंब तालुक्यातील ३०९५ शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन,मुंग,ज्वारी या पिकांचा विमा रु.८३०५३७०/- (त्र्यांशी लाख पाच हजार तीनशे सत्तर रुपये) जाहीर होऊन सुद्धा ते आता पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाही. जाहीर झालेला पैसा हा विमा कंपनीने जवळजवळ एक वर्ष स्वतः जवळ ठेवला त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व युवक काँग्रेस संतापली आहे, सदर निवेदनाची दखल घेऊन पीक विम्याची नुसकान भरपाई त्वरित देण्यात यावी. या निवेदनाला उपस्थित ना.वसंतरावजी पुरके(मा.शिक्षण मंत्री) ,बाबासाहेब दरने, दिगंबर मस्के(मा.नगराध्यक्ष, कळंब), महादेव काळे, गजानन पंचबुद्धे ,विलास राठोड,निलेश मेत्रे, शशिकांत देशमुख, चंदू चांदोरे,सोनू सिद्दीकी,योगेश मानकर, पवन जाधव अभिलाष नित,कुणाल पंचबुद्धे,प्रशांत शास्त्रकार,पवन कासार, राहुल सोनाळे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.