तहसीलदार कानडजे यांचे हस्ते वरूड येथील उपोषणकर्त्यांना दिले लिंबूपाणी, श्री प्रफुल्लभाऊ मानकरांनी दिला चौकशीचा शब्द.

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील रघुनाथ स्वामी मंदीराची बरीचशी संपत्ती, संचालक मंडळ, बेकायदेशीर व्यवहार, मिळालेल्या पैशाची चौकशी अशा अनेक मुद्द्यांना घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री उत्तमराव भोरे,श्री गोविंदराव झाडे,श्री अंगदराव आडे यांनी दिनांक 6/6/2022 पासून मंदीरातच आमरण उपोषण सुरू केले होते.या उपोषणात अनेक पदाधिकारी, अधिकारी, गावातील प्रतिष्ठित यांनी भेट देऊन आपली मते मांडली होती.त्यानंतर दिनांक 10/6/2022 रोजी राळेगाव तहसिलचे तहसीलदार डॉ.कानडजे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांना समजून घेतले व त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.परंतू उपोषणकर्त्यानी मात्र माजी शिक्षणमंत्री पुरके सर आणि कांग्रेस कमेटीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अँड.प्रफुल्लभाऊ मानकर आल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही असा हेका धरला त्यावेळी सर मुंबईत असल्यामुळे व भाऊंचा दुसरा कार्यक्रम असल्याने ते येणे शक्य नसल्याने डॉं कानडजे तहसीलदार राळेगाव व अँड प्रफुल्लभाऊ मानकर व उपोषणकर्ते यांच्यात भ्रमणध्वनीवर चर्चा घडवून आणली.त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी त्यांना योग्य ती चौकशी करून आपणास न्याय मिळवून दिला जाईल,सोबतच मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या सोबत सुध्दा चर्चा करून निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन दिले.सोबतच प्रफुल्लभाऊ मानकर यांनी सुध्दा उपोषणकर्त्यांना भ्रमनध्वनीवरून मी जिल्हाधिकारी साहेबांना भेटून , चर्चा करून आपणांस न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासन दिले या प्रदीर्घ चर्चेनंतर मा.तहसिलदार साहेब राळेगाव यांनी शरबत देऊन उपोषण सोडले.त्यावेळी मंडल अधिकारी श्री एम.डी.सानप,तलाठी ओंकार,सोबतच गावातील सदानंद भोरे,पुनेश्वर उईके, गजानन पारधी, प्रविण भोरे, प्रशांत भोरे, दशरथ भोरे,मोहन कडू, राहूल भोरे, गजानन घोडाम, अंकुश डायरे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.