
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगाव (रेल्वे), जि. अमरावती येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थि अजय नेवारे, रोहन राडे, पंकज वैद्य, भूषण तडस, अविनाश तिखट, गणेश विहिरकर, प्रज्वल ठाकरे, व राहुल पाटील यांनी हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांना अझोला या शेवाळाविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रम कृषी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) करण्यात आला, यावेळी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. सी. यू. पाटील सर, उपप्राचार्य डॉ. एस. के. नायक सर, कार्यक्रमाचे अधिकारी श्री. पी. व्ही. चीमोटे सर, विषयतज्ञ कु. लांडे मॅडम, व इतर प्राध्यापकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीविद्यार्थि विविध उपक्रम राबवत आहेत. यावेळी हिंगणघाट येथील शेतकऱ्यांना अझोला शेतीचे महत्व, फायदे, व अझोला शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
अझोला – चारा/खाद्य स्वरूपातील घटक :-
• प्रथिने, आवश्यक एमिनो ऍसिडस्, जीवनसत्वे (व्हिटॅमिन ए, बी 12 आणि बीटाकेरोटिन) वाढ आणि खनिजांसाठी जसे कॅल्शियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम यांनी परिपूर्ण आहे
• शुष्क वजन आधारित, याच्यामध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10-15 टक्के मिनरल आणि 7-10 टक्के ऍमिनो ऍसिडस्, बायोऍक्टिव्ह पदार्थ आणि बायो-पॉलिमर्स
• याच्यात उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंट असूनसुध्दा जनावरांना सुलभतेने पचणारे
• अझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच अझोला जनावरांना देऊ शकतो
• अझोला हे पोल्ट्री, शेळ्या-मेंढ्या, डुकरे आणि ससे यांना ही दिला जाऊ शकतो.
अझोलापासूनचे इतर फायदे:-
अझोला वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी झाडांसाठी वापरता येते, तसेच वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या एक किलो मातीचे गुणधर्म हे सुमारे ०.५ किलो रासायनिक खताइतके आहे. अझोला लागवड हे सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर तंत्रज्ञान असून, ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे, त्याचा जनावरांच्या आहारात वापर करणे ही काळाची गरज आहे.
अझोला उत्पादन कसे करावे ?
• जमीन सारखी व स्वच्छ करून घेण्यात येते.
• आयताकार स्वरूपात विटा आडव्या टाकल्या जातात.
• विटांनी तयार करण्यात आलेल्या आयताकाराच्या मार्जिनला झाकणारी 2mX2m मापाची एक पातळ यूव्ही स्टॅबिलाइझ्ड शीट टाकली जाते.
• 10-15 किलो चाळून बारीक केलेली माती सिल्प्यूलाइन पिट वर टाकण्यात येते.
• 2 किलो शेणाचे स्लरी तयार करण्यात येते आणि 30 ग्राम सुपर फॉस्फेट 10 लिटर पाण्यात मिसळून, शीटवर टाकण्यात येते. पाण्याची पातळी 10 सेमी वाढविण्यासाठी आणखी पाणी टाकण्यात येते.
• सुमारे 0.5 ते 1 किलो शुध्द मदर अझोला कल्चर बी, माती व पाणी एकसारखे करून अझोला बेड वर पसरतात.
•अझोलाच्या रोपांवर तात्काळ पाणी शिंपडावे.
• एका आठवड्याच्या काळात, अझोला बेड वर सर्वत्र पसरतो आणि एखाद्या जाड्या चटईसारखा दिसतो.
• 20 ग्राम सुपर फॉस्फेट आणि सुमारे 1 किलो गाईचे शेण 5 दिवसांत एकदा मिसळण्यात आले पाहिजे ज्यायोगे अझोलाची लवकर वाढ आणि रोजची 500 ग्रामची उपज कायम राहील.
• मायक्रोन्यूट्रिंट मिक्स ज्यामध्ये मॅग्नेशियम, लोह, तांबे, गंधक इत्यादि देखील आठवड्यातून एकदा मिसळावे म्हणजे अझोलातील खनिज घटकांची वाढ होईल.
• 30 दिवसांतून एकदा, सुमारे 5 किलो बेड माती ताज्या मातीने बदलून टाकावी, ज्यायोगे नायट्रोजनची वाढ आणि मायक्रोन्युट्रिंटची कमतरता यांच्यावर उपाय होईल.
• 25 ते 30 टक्के पाणी देखील, दर 10 दिवसांनी बदलावे, म्हणजे बेडवर नायट्रोजनची वसढ होण्यापासून बचाव होईल
बेड स्वच्छ ठेवावा, पाणी व माती बदलावी आणि नवीन अझोला दर सहा महिन्यांनी लावावा.
• अझोलाच्या शुध्द कल्चरने युक्त असा ताजा बेड लावावा जेव्हा कीटक किंवा रोग लागणे सुरू होईल.
यावेळी गावातील शेतकरी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
