
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
कोरोना महामारीत दीड वर्षा पासून बंद असलेली बस आज मंगळवार दि 3 ऑगस्ट पासून वडकी ते आचार्य विनोभा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे ही बस रुग्णांसाठी सुरू करण्यात आली आहे, ह्यावेळी वडकी बसस्थानक परिसरात या बसला वडकी येथून हिरवी झेंडी दाखवून प्रस्थान करतांना वडकी ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री शैलेशजी बेलेकर व अनेक नागरिक उपस्थित होते.तसेच वडकी ग्रामपंचायत तर्फे बस चालक श्री पठाण यांचा शाल व श्रीफळ देऊन ह्यावेळी सत्कार करण्यात आला. सदर कार्यसिद्धी साठी गावसेना परिवार प्रमुख श्री प्रदिपभाऊ कडू यांनी प्रयत्न केले.उपस्थित मान्यवरांनी सावंगी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला! या रुग्णबस सेवेचा लाभ परिसरातील गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
