
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अंगणवाडी मधील चिमुकल्यांना साहित्य वाटप करण्यात आले आहे.
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने कडून अंगणवाडी 2 मध्ये अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अंकलिपी पाटी, खडू वाटप करुन शिव जयंती साजरी केली, शासनाच्या जीआरनुसार लॉकडाऊन च्या अभावामुळे अंगणवाडी येथील विद्यार्थी शाळेत हजर ठेवण्याची परवानगी नसल्यामुळे अंगणवाडी येथील विद्यार्थी हजर नसल्यामुळे साहित्य अंगणवाडी सेविका यांच्या कडे देण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून साध्या पध्दतीने महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष शैलेश आडे ,अंगणवाडी सेविका संगीता ताई मोहद,मदतनीस सविता ताई राऊत निर्मला मेश्राम ,गावातील राजू भाऊ मेश्राम उपसरपंच बंडुजी धुळे ,ग्रा,सदस्य संदीप मेश्राम ,कुणाल घोडाम मनोज मेश्राम रोशन बावणे यांच्या सह मनसे मनविसे पदाधिकारी उपस्थित होते.
