प्रधानबोरी शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त जि प उच्च प्राथमिक शाळा प्रधानबोरी शाळेत बालिका दिवस साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री संजय ठाकरे शा व्य स अध्यक्ष, उप सरपंच कवीश्वर गेडाम, पोलिस पाटील गंगाधर भिसे, उपाध्यक्ष सौ अनिता नक्षणे, मुख्याध्यापक संजीव भोंग उपस्थित होते,
शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई च्या कार्यावर उत्कृष्ट भाषणे दिली सर्व मुली सावित्रीबाई च्या पोशाखात होत्या,
कार्यक्रमाचे संचालन सचिन गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राठोड यांनी केले, गजानन कोटनाके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले शेवटी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.