
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील सरई येथे आज सरपंच पदी किशोरभाऊ अण्णाजी हिवरकर या नवयुवकाची निवड करन्यात आली शांत संयम अशा स्वभावाचा सरपंच या गावाला लाभला असे जनसामान्यांच्या तोंडून हे शब्द ऐकायला मिळत आहे किशोरभाऊ हिवरकर यांनी गावात ग्रामपंचायत लढविले ते भरगच्च मतांनी सुद्धा निवडून आले यात ज्यांनी आजपर्यंत गावांमध्ये कोणतेही सामाजिक कार्य किंवा इतर समस्या घेऊन गावकरी यांना न्याय दिला नाही असे सुद्धा या रिंगणात उभे होते अशा हौसे गौसे यांना मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत दहा मतांच्या वर वोट मिळाले नाही हे मात्र विशेष या निवडीवर बंडुजी गेडेकर, हेमराजजी तिजारे, भारतीताई जिवतोडे यांनी आनंद साजरा केला व तसेच सरई या गावात किशोर भाऊ हिवरकर यांची सरपंच पदी निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण दिसत आहे.
