सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नदीत उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

  

राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा येथील युवा अल्पभूधारक शेतकरी विशाल लीलाराम लेनगुरे वय वर्षे ४१ रा. रिधोरा यांनी १८ जुलै रोजी वर्धा नदीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना रिधोरा येथे घडली आहे. सदर या घटनेची फिर्याद चंद्रशखर लीलारामजी लेनगुरे यांनी वडकी पोलिसांत दिली. सदर मृतक विशाल लेनगुरे हा १८ जुलै रोजी आपल्या पत्नीला सांगत होता की आपल्या कडे सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाढोणा बाजार यांचे कर्ज आहे तर काही महिला बचत गटांचे कर्ज आहे तर काही खाजगी कर्ज काढून आहे. आणि पाणी असा करत आहे पाण्यामुळे आपले पीक संपूर्ण दल दल झाले आहे इतके मोठे नुकसान झाले आहे तर आता आपले कर्ज कसे फेडायचे आता मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. मी आता वर्धा नदीत जावून आत्महत्या करतो असे त्यांची पत्नी कांचन लेनगुरे इला सांगून घरुन निघून गेला विशालच्या पत्नीने विशालला खूप समजूत घातली होती परंतु तो डोळ्यात धुळ झोकून कधी घरुन निघून गेला हे कुणालाही महिती पडले नाही.तर काही वेळाने वडकी वरून पांडुरंग वानखडे यांनी रिधोरा गावांमध्ये फोन करून सांगितले की विशाल लेनगुरे यांनी वर्धा नदीत उडी घेतली आहे. फोन येताच गावातील लोकांनी वर्धा नदी कडे धाव घेतली होती परंतु वर्धा नदीला समुद्राचे रुप आले असल्या कारणाने विशालचा कुठेही पत्ता लागला नाही. सदर या घटनेची फिर्याद चंद्रशखर लेनगुरे यांनी वडकी पोलिसांत दिली असून पुढील शोध घेण्याचे काम वडकी पोलिस करीत आहे.