
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात करंजी ( सो ) येथे मा.उपसरपंच अनिल कोडापे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सरपंच प्रसाद ठाकरे यांनी उपस्थित मान्यवरांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले व ध्वजारोहणाला उपस्थिती झाल्या बद्दल मान्यवरांचे आभार मानले,
यावेळी जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका रुपाली कन्नाके मॅडम,जि.प.शिक्षक स्वप्नील कुदुसे सर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर कांडुरवार,शाळा समितीचे अध्यक्ष विजय देठे,ग्रामरोजगार सेवक चेतन वाभीटकर,संगणक परिचालक अमोल राऊत,शिपाई वाल्मिक कोडापे,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,समस्त ग्रामपंचायत सदस्य,विद्यार्थी तथा गावकरी उपस्थित होते.
