
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव पंचायत समिती अंर्तगत येत असलेल्या आपटी रामपुर येथील शेतकरी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतातील विहिरी पासुन वंचित असल्याने आपटी ग्रामपंचायत विषयी रोष व्यक्त होताना दिसुन येत आहे आपटी येथील शेतकरी पांडुरंग चंपत वाटे मारुती पांडुरंग देशमुख प्रभाकर उद्धवराव पटेलपैकं विनोद शंकरराव ठाकरे लक्ष्मण पांडुरंग देशमुख असे पांच शेतकऱ्यांनी अर्ज करून ग्रामपंचायत मार्फत विहिरी करीता राळेगाव पंचायत समिती मध्ये आपटी ग्रामपंचायतने ग्रामसभेमधुन निवड करुन प्रस्ताव टाकण्यात आले असता दिनांक २८ मार्च २०१७ रोजी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत या पाच शेतकऱ्यांना विहिरी करीता तांत्रीक माण्यता देण्यात आली व प्रशासकीय माण्यता दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी देण्यात आली असतांना या विहीर खोद कामाला अध्यापही संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती विभागाने खोद कामाला लेआऊट पाडुन देण्यात आले नाही त्यामुळे विहीर खोदकामाला सुरुवात करण्यात आली नाही आज या विहीर मंजुरातीला आज चार वर्ष पुर्ण झाली तेव्हा पासुन हे शेतकरी पंचायत समितीच्या व ग्रामपंचायतच्या चकरा मारत आहे तरी विहीर खोदकामाला गती देण्यात आली नाही त्यामुळे आपटी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अजुनही या पाच शेतकऱ्यांना विहिर खोदकाम करण्यासाठी ग्रामपंचायत कडुन कोणत्याही प्रकारची मदत होतांना दिसुन येत नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना चार वर्षांपासून विहिरी करीता प्रतिक्षा करावी लागत आहे अनेकदा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन दिली पंरतु उडवाउडवीची उत्तरे देऊन मनसमजवनी करण्यात येत आहे त्यामुळे आम्ही पांच शेतकरी विहिरीपासुन वंचित राहावे लागत आहे तरी संबंधित अधिकारी यांनी आमच्या विहिरीचे लेआऊट पाडुन द्यावे अशी शेतकऱ्यांनी निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे.
