आजनसरा-रोहिणीला जोडणारा वर्धा नदिवरील पुलाला मंजुरात द्या :- भाविकांची मागणी


राळेगाव तालुका प्रतिनिधी:–रामभाऊ भोयर (9529256225)


विदर्भातील च न्हवे तर सर्वत्र भाविकांचा गोतावळा असणाऱ्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराज यांचे वास्तव्य राहिलेल्या गावाला लागूनच काही अंतरावर वर्धा नदीचा प्रवाह आहे यवतमाळ वर्धा जिल्ह्याला जोडणारे हे पात्र आहे यवतमाळ जिल्ह्यातील रोहिणी व वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथून जाणाऱ्या नदीच्या पात्रावर पुलाच्या कामाला मंजुरात द्यावी म्हणजे भाविक भक्तांसाठी सोयीचे होईल अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील संत भोजाजी महाराजांच्या भक्तांनी केली आहे. मागील ८०ते ९० वर्षा पासून महाराजांचे प्रस्त या परिसरात आहे आज संपूर्ण विदर्भासह सर्वत्र महाराजांचे भक्त आहेत पुरण पोळी चा स्वयंपाक हाच महाराजांचा प्रसाद मानल्या जातो बुधवार महाराजांचा दिवस आहे बुधवार रविवार ला भक्त मोठ्याप्रमात कुटूंब नातेवाईक यांना घेऊन दर्शन व स्वयंपाका करीता येतात परंतु राष्ट्रीय महामार्ग हेद्राबाद ते नागपूर जाणारा जवळच आहे परंतु विदर्भातील बुलढाणा अकोला वाशीम अमरावती या जिल्ह्यातील येणाऱ्या प्रवाशांना भक्तांना हा मार्ग दूर पडतो रोहिणी आजनसरा हा वर्धा नदीवरील पूल झाल्यास सर्वानाच सोईचे होईल या साठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दोन्ही जिल्ह्यातील राजकीय लोकांनी निवेदन दिले आहे या परिसराचा सर्व्ह झाला आहे आता प्रतीक्षा मंजुरात देऊन कामाला सुरुवात होण्याची आहे .केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना राळेगांव मतदार संघाचे आमदार प्रा डॉ अशोक उईके व हिंगणघाट मतदार संघाचेआमदार समीर कुणावार यांनी व सर्वच पक्षीयांनी प्रयत्न करावे अशी परिसरातील भाविकांची मागणी आहे.