न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची अविरोध निवड अध्यक्ष पदी कु.रेखाताई कुमरे, उपाध्यक्ष पदी विनोदराव चिरडे तर सचिव पदी किशोरराव उईके यांची अविरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

              राळेगाव येथील स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची नुकतीच नवीन कार्यकारणी  संचालक मंडळाची अविरोध निवड करण्यात आली.  यामध्ये  संस्थेचे पदाधिकारी म्हणून अध्यक्ष पदी कु. रेखाताई कुमरे उपाध्यक्ष पदी  विनोदराव चिरडे  तर  सचिव पदी किशोरराव उईके यांची नवीन संचालक मंडळातून अविरोध निवड करण्यात आली  तर अविरोध संचालक म्हणून अरुणजी कामनापूरे,सुरेशराव कोवे,सुचितजी बेहरे

किशोरराव उईके,कु.रेखाताई कुमरे, गोपालराव बुरले,विनोदराव चिरडे, नितीनजी जुनुनकर कु.जयाताई ठवरी
शैलेषराव वातीले, प्रवीणजी चौधरी,विनोदराव तायडे,प्रफुल्लजी चांदेकर,निलेशजी उमरे, भास्करराव लोंढे यांची संचालक म्हणून अविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून सौं. वर्षाताई चौधरी यांनी कामकाज पाहले. तर न्यू इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाची अविरोध निवड झाल्या बद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी, संस्थेचे अध्यक्ष भाऊराव धर्मे, सचिव सौं अर्चनाताई धर्मे, प्राचार्य मोहनराव देशमुख, उपप्राचार्य प्रा. जितेंद्रजी जवादे, पर्यवेक्षक विजयराव कचरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून नवनियुक्त पदाधिकारी व संचालक मंडळाचे निवडीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.