एकभुर्जी येथे झाड पडून एका बैलाच मृत्यू तर टाटा मॅक्स चे नुकसान (वादळ वाऱ्यामुळे लाखोंचे नुकसान)

राळेगाव तालुका प्रतिनिधी : रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील काही भागात आज शुक्रवार ला जोरदार पाऊस व हवा आल्याने झाड पडून एक बैल ठार झाला तर  मॅक्स गाडी वर झाड पडल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती एकभुर्जी येथील शेतकरी सालोडकर यांनी दिली.आज दुपारी पासूनच आकाशात काळे ढग दाटून आले होते. दरम्यान राळेगाव तालुक्यात काही भागात हवे सह जोरदार पाऊस पडला त्या दरम्यान एक भुर्जी येथील शुभम सालोडकर यांचा बैल झाडा जवळ बांधून होते. त्यातील एक बैल सोडला तर  दुसऱ्या बैलाच्या  अंगावर मोठे निबांचे झाड पडल्याचे त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला व टाटा यस चे ही नुकसान झाले शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे.