
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील भांब व इतर सात शाळेमध्ये नॅशनल अचिव्हमेंट सर्व NAS ची टिम दाखल झाली त्यावेळी जिल्हा परिषद शाळा भांब व ग्रामपंचायत भांब च्या वतीने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले परीक्षक म्हणून श्री.घुगरे सर केंद्रप्रमुख ,श्री.विनोद चिरडे सर व श्री.गजभिये सर यांची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांनी राष्ट्रीय संपादणूक पातळी बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.तसेच नंतर विद्यार्थी ची परीक्षा घेण्यात आली.शाळेने केलेल्या तयारी बाबत टीम अतिशय प्रसन्न वाटली.व विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद दिला. नंतर NAS च्या टीमचे ग्रामपंचायत सरपंच सौ.माधुरी ताई झाडे व उपसरपंच विजय कोल्हे आणि शाळेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांना NAS सर्वे बदल मार्गदर्शन केले आणि ग्रामपंचायत व शाळा यांनी टीमच्या स्वागतासाठी परिसर स्वच्छ आणि रांगोळी काढून टीमचे स्वागत केले. केलेल्या तयारीचे टीमने खूप मनापासून आभार मानले आणि नंतर ग्रामपंचायत सरपंच माधुरीताई झाडे ,उपसरपंच विजयराव कोल्हे ग्रामपंचायत सदस्य नितीनजी झाडे,सदस्या कु.धरती कोवे, गामसेवक मडावी ग्रा.प.भांब शाळेचे मुख्याध्यापक श्री.वसंतराव जुमनाके सर सहायक शिक्षिका सौ.तेजस्विनी योगेश गलाट व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलासराव डंभारे, नरेशजी कुबडे, यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा च्या शुभेच्छा दिल्या आणि सर्वेला सुरवात करण्यात आली. व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आठमुडी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वडकी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाढोणा बाजार, शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा किनी जवादे, बचपन इं.मे.स्कूल राळेगाव, मार्कंड पब्लिक स्कूल बराडगाव , राजश्री शाहू महाराज माध्यमिक शाळा गुजरी येथे NAS च्या टीमने भेट दिली व अशाच प्रकारे इतर शाळांमध्ये असाच उपक्रम करण्यात आला.
