आदर्श ग्राम रावेरी येथे विधवा महिलेच्या हस्ते झेंडावंदन


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील ग्राम पंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिनी पंधरा आगष्ट रोजी रावेरी ग्राम पंचायतीचे सरपंच राजेंद्र वामनराव तेलंगे व ईतर पदाधिकारी बंधू भगिनींनी गावातील विधवा श्रीमती प्रेमिला नारायणराव वाणी या महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा आगळा वेगळा उपक्रम सरपंच राजेंद्र वामनराव तेलंगे यांनी राबवून एक वेगळा पायंडा पाडला असून या उपक्रमामुळे या ध्वजारोहणाची तालुक्यात चर्चा होत असून अशा प्रकारचा चांगला पायंडा प्रत्येक संस्थेने पाडून अशा प्रकारे नवा आदर्श निर्माण केला तर एक नावलौकिक तयार झाल्या शिवाय राहणार नाही.अशा या आगळ्यावेगळ्या पद्धतीने रचलेला इतिहासात रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे, उपसरपंच गजानन झोटींग, विनोद काकडे, निखिल काकडे सौ. चंदा पिंपरे,सौ.कल्पना पाल,सौ.विद्या ठावरी,सौ.विमल डाखोरे,सौ.वनिता शेळके, यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सोबतच उच्च प्राथमिक शाळा रावेरी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती साहेबराव मेसेकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी ग्राम पंचायत सचिव कुराडकर,शाळेचे मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक बंधू भगिनी व गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.