
द्रुष्टी सर्वांगीण विकासाची
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
कीन्ही जवादे.ता.राळेगाव.जी.यवतमाळ
बेंबळा धरण प्रकल्पाचे मुख्य कालव्याचे पाणी कीन्ही जवादे ते बोरी या उपकालव्यात येत नव्हते,कीन्ही,बोरी, गाडेघाट या शेतशीवारात कालव्याचे पाणी पोहचत नव्हते.कालवा ४०/५०फुट खोल असुनही पावसाळ्यात बाजुचा मुरुम कालव्यात पडत असल्याने समोर पाणी पोहचत नव्हते.ही बाब इंजिनिअर आदित्य सुधीर जवादे,व पाणी वापर संस्थेच्या शेतकऱ्यांनी बेंबळा कालवे विभागाचे लक्षात आणून दिली व पाईप द्वारे पाणी पुरवठा करण्याचें सुचवले.वरील मागणी मंजूर करण्यात आली.दोन करोड रुपये चे कामास सुरुवात झाली.सध्यस्थीतीत काम प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे.डाॅ.पंजाबराव देशमुख पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष,तथा सरपंच सुधीर जवादे, वैजयंतीताई चवरडोल, विलासराव क्षीरसागर,नानीबाई सराटे,वर्षाताई मोघे, प्रवीण गोटेफोडे,खांदणकर, यांनी या कामासाठी विषेश प्रयत्न केले. सींचन विभागाचे डेप्युटी इंजिनिअर पींगळे साहेब,कडु साहेब यांनी सहकार्य केले.
