अवैध दारु विक्री व अस्त्यवस्त वाहतूक व्यवस्थेस लगाम लावण्यात पोलिस स्टेशन राळेगांव सपेशल अपयशी चं ?

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

पोलिस स्टेशन राळेगांव च्या दुर्लक्षित धोरणामुळे अवैध देशी दारु विक्री, अस्त्यवस्त वाहतूक व्यवस्था रोखण्यात सह इतर अवैध व्यवसाय सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फोफावले असल्याचे निदर्शनास येत आहे.या मध्ये काही राजकीय मंडळी चा पाठींबा असल्याची चर्चा आहे
राळेगांव शहरात व तालुक्यात खुलेआमपणे अवैध देशी दारु विक्री होत आहे. पंधरा दिवसां पुर्वी च वाटखेड जवळ झालेल्या अपघातात दोन इसम मृत्यूमुखी पडले. घटनास्थळी दारु च्या पेट्या पडून होत्या.हे सप्रमाण नाही का?
राळेगांव शहरात बहुतांश प्रभागात अवैध देशी दारु विक्री ची दुकाने सुरु आहे.विशेषतः यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व आदिवासी मुलींच्या वसतिगृहा जवळ, शांतीनगर,शिवाजी नगर सह अन्य ठीकाणी हमखास पणे विक्री सुरु आहे. आणि दारु बंदी वर्धा जिल्हात दारुचा पुरवठा नित्यनेमाने सुरु आहे. अवैध रेती तस्करी ही तर सोन्याचं अंडे देणारी कोंबडी पोलिस स्टेशन राळेगांव साठी ठरत आहे. दिड महिन्या आधी झाडगांव च्या बीट जमादाराला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे धाडीत रंगेहाथ सापडला होता..
राळेगांव शहरातील अस्त्यवस्त वाहतूक व्यवस्था दररोज छोटे मोठे अपघाता साठी कारणीभूत ठरत आहे.
दुकानां समोर वाहनांची गर्दी,आवागमन करणाऱ्यां साठी त्रासदायक होत आहे. वाहतूक शिपाई नाही, उपविभागातून दोन तीन दिवसाआड दोन वाहतूक शिपाई येतात. वर्धा बायपास,विश्रामगृह, पंचायत समिती राळेगांव जवळ उभे राहून कशाची तपासणी करतात की अजून काही देवाणघेवाण?ते तर उघड्या डोळ्यांनी दिसतेचं.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागून नविन वस्ती कडे जाणारा रस्ता शुक्रवार बाजार दिवशी ये जा करण्यासाठी दुकाने रस्त्यावर वाहन ही रस्त्यावर बंद असतोय. या शिवाय चॅम्पियन्स बाईक स्वारांचा दिवसेंदिवस हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढला असून पोलिस स्टेशन राळेगांव ची बघ्याची भूमिका बरंच काही सांगून जातेय.